प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

B.Sc Agri अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; ५ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बी.एस्सी ॲग्री अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवार, २६ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरूवात झाली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बी.एस्सी ॲग्री अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवार, २६ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहे.

कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतन मधून ३ वर्षाचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश दिला जातो. या प्रवेशसाठी खुल्या प्रवर्गासाठी किमान ६.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुण (सीजीपीए) सह उत्तीर्ण व आरक्षित प्रवर्गासाठी किमान ५.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह (सीजीपीए) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

राज्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठांतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामधील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात येतो. प्रवेश।प्रक्रियेची माहिती पुस्तिका agripug2024.mahacet.org या संकेतस्थळावर २६ जूनपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

अर्धनग्न, मुंडन करत आंदोलनकर्त्यांचा निषेध; डुप्लिकेट जरांगे-पाटील आले चर्चेत

राज्यघटनेत दुरुस्ती केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल - शरद पवार

वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांचा पेन्शनसाठी अर्ज