महाराष्ट्र

दुर्घटनाग्रस्तांचं कायमचं पुनर्वसन करण्यासंदर्भात चर्चा सुरु ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असल्याने मदत कार्यात अडथळा येत आहे. अवजड मशिनरी व अवजार पोहोचण्यात अडचणी येत आहेत

नवशक्ती Web Desk

रायगडच्या खालापूर जिल्ह्यातील इर्शाळवाडी वरील बुधवारी रात्री दरड कोसळून अख्खं गाव गाडलं गेलं. याघटनेची माहिती मिळतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले. यावेळी मुख्यमंत्री दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याच काम करत होते. त्यांनी सांगितलं की, यात आतापर्यंत बारा लोकांचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. तसंच यावाडीतील १०३ लोकांचे ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी ९० जण सुरक्षित आहेत. जखमींवर पनवेल एमजीएम रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेत मृत व्यक्तींना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय देतला आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने मदत कार्यात अडथळा येत आहे. अवजड मशिनरी व अवजार पोहोचण्यात अडचणी येत आहेत. खराब हवामानामुळे तैनात केलेले दोन हेलिकॉप्टर येथे पोहोचू शकलेले नहाीत. अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. तसंच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन याठिकाणी येते रात्रीपासून उपस्थित असून अधिकारी, रेस्क्यू टीम यांच्या संपर्कात रात्रीपासून होतो, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

तसंच बचाव कार्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, वाचलेल्या वक्तींना सुरक्षित ठिकाणी हलवणे यास प्राधान्य दिलं जात आहे. याबाबतचं नियोजन झालं आहे. दुर्घटनाग्रस्त लोकांचं कायमचं पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले