जिल्हा बँकेतील शिपाई भरती ऑफलाइन पद्धतीने; स्थानिकांना १०० टक्के प्राधान्य संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

जिल्हा बँकेतील शिपाई भरती ऑफलाइन पद्धतीने; स्थानिकांना १०० टक्के प्राधान्य

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यानुसार जिल्हा बँकेतील शिपाई पदाच्या भरतीला आता ऑनलाइन पद्धतीतून वगळण्यात आले आहे. भरतीत १०० टक्के स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या कोणताही भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्यास संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहकार विभागाने आहे.

या पदासाठी लेखी परीक्षेला ७० गुण आणि मुलाखतीला ३० गुण अशी गुणरचना निश्चित करण्यात आली असून, किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे.

....तर जिल्ह्याबाहेरील उमेदवार

स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी चतुर्थ श्रेणीतील पदभरतीमध्ये संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, आवश्यक स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास उर्वरित पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधून भरण्याची मुभा आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश