डोंबिवली स्फोट fpj
महाराष्ट्र

"इन्स्पेक्शन असलं की ते शटर बंद करून...", अमुदान कंपनीवर शेजारच्या कंपनी मालकांचे गंभीर आरोप

Suraj Sakunde

मुंबई: डोंबिवलीतील MIDC मधील अमुदान कंपनीत आज दुपारी १ः३० वाजताच्या सुमारास स्फोट होऊन ६ जणांचा मृत्यू झाला, तर ४८ जण जखमी झाले आहेत. या आग दुर्घटनेमुळं अमुदान कंपनीच्या शेजारच्या कंपन्यांचंही मोठं नुकसान झालं. दरम्यान, अमुदान कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा साठा ठेवला होता. त्याचं योग्य प्रकारे निरीक्षण होत नव्हतं, असा आरोप अमुदान कंपनीच्या शेजारील कंपनीच्या मालकांनी केला आहे.

त्याला कळलं इन्स्पेक्शन आहे की तो शटर बंद करून द्यायचा...

अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीचे मालक डॉ. शेवडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "माझ्या कंपनीचं नेमकं किती नुकसान झालंय, हे सध्या मला कळत नाहीये. कारण आम्हाला आत जाता येत नाहीये. परंतु मी आधी दोनदा त्यांना सांगितलं होतं. तो दुसरीकडची फॅक्टरी बंद करून इकडे आला होता तेव्हा त्याला इथं कंपनी सुरू करू देऊ नका, असं आम्ही सांगितलं होतं. हे धोकादायक आहे. इथं पूर्वीही एकदा अशी घटना होती. तशी परत घडू शकते. फॅक्टरी इस्पेक्टरनी नेमकं काय केलं? अध्यक्षांनी काय केलं? माझा काही दोष नसताना, आज मी माझं नुकसान करून बसलोय. मी काय करायचं आता? त्याला कळलं इन्स्पेक्शन आहे की तो शटर बंद करून द्यायचा. "

उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंची घटनास्थळी भेट-

डोंबवली आग दुर्घटनेची माहिती मिळतात उद्योग मंत्री उदय सामंत आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. उदय सामंत म्हणाले की, "बॉयलरचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक आहे. मी स्वतः तिथं जाऊन आलोय. यावरती तात्पुरता उपाय काढून उपयोग नाही. इथल्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करायच्या आहेत, त्याचाही धोरणात्मक निर्णय झाला आहे. जखमींचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आपण यावर कायमस्वरूपी उपाय काढलेला आहे. परंतु दुर्दैवानं ती प्रक्रिया होण्यापूर्वीच ही घटना घडली. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल."

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस