महाराष्ट्र

गुजरातमध्ये ८०० कोटींचे ड्रग्ज जप्त तस्कर फरार

छाप्यामध्ये मुद्रकिनाऱ्यावरून कोकेनची ८० पाकिटे जप्त केली

नवशक्ती Web Desk

अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळून त्यांनी सुमारे ८० किलो ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत सुमारे ८०० कोटी रुपये असल्याचे समजते. खबऱ्यांकडून यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत तपास सुरू केला. पोलिसांची धाड पडताच ड्रग्ज तस्कर अमली पदार्थांचे पॅकेट्स तिथेच टाकून फरार झाले.

शुक्रवारी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे ही कारवाई करण्यात आली. समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात ८० किलोपेक्षा जास्त वजनाचा अमली पदार्थांचा हा साठा बेवारस अवस्थेत पडलेला आढळला. एफएसएलच्या प्राथमिक तपासात हे कोकेन असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीधाम शहराजवळील खाडीकिनारी सुमारे ८० पॅकेट्समध्ये कोकेन सापडले. या प्रत्येक पॅकेटचे वजन साधारण एक किलो तरी आहे. पोलीस या ठिकाणावर सतत लक्ष ठेवून होते. छापा पडणार असल्याची माहिती मिळाल्यावर पकडले जाण्याच्या भीतीने ड्रग्ज तस्करांनी सर्व माल तिथेच टाकला आणि ते फरार झाले, असे कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले. ड्रग्जच्या डिलिव्हरीबाबत खबऱ्यांतर्फे आम्हाला माहिती मिळाली होती.

त्यानंतर आम्ही पथक तैनात करून शोधमोहीम तीव्र केली. यावेळी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये आम्ही समुद्रकिनाऱ्यावरून कोकेनची ८० पाकिटे जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ८०० कोटी रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र गुरुवारी गांधीधामजवळ जप्त करण्यात आलेल्या पॅकेट्सचा पूर्वी सापडलेल्या ड्रग्जच्या पॅकेटशी काहीही संबंध नसल्याचे बागमार यांनी स्पष्ट केले. ही पॅकेट्स अलीकडेच जप्त करण्यात आली असावीत. आम्ही माहितीनंतर ज्यांचा मागोवा घेत होतो, त्याच मालाचा ही पाकिटे भाग असावीत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

नेपाळ सरकारने सोशल मिडियावरील बंदी हटवली; युवकांच्या आंदोलनाला यश

Stoinis-Sarah Engagement Photos: स्पेनच्या समुद्रकिनारी स्टॉयनिसचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज

आशियातील वर्चस्वासाठी आजपासून चुरस! Asia Cup 2025 स्पर्धेत भारतापुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, बघा सर्व सामन्यांचं वेळापत्रक

मिठी मारणे हा ‘तिच्या’ शालिनतेला धक्काच; आरोपीला न्यायालयाने ठोठावली एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

२,१०० रुपयांचा लाभ लवकरच! मंत्री आदिती तटकरे यांचा `लाडक्या बहिणीं`ना शब्द