महाराष्ट्र

प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न; सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट

राज ठाकरे-अमित शहा यांच्या भेटीवर सुशीलकुमार शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, हा निवडणूक प्रक्रियेमधील निरनिराळ्या पक्षांचा चालणारा भाग आहे. त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही.

Swapnil S

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले गेले. सोलापूरच्या जागेसाठी प्रणिती शिंदे यांना सोबत घेण्याचा भाजपचा विचार होता, त्यासाठी भाजपवाले येत होते, मात्र आम्ही मनाने खंबीर राहिलो, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, प्रणितीने ठाम विचार केला होता की, मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे, जी गांधी-नेहरूंची काँग्रेस आहे. सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सोलापूरमध्ये काही दिवसांपर्यंत होत होती. विभागीय नाट्यसंमेलनाच्या दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप प्रवेशाची आम्हाला ऑफर होती, असा गौप्यस्फोटही केला होता. मात्र, ऑफर देणाऱ्या नेत्याचे नाव मी उघड करणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आज प्रणिती शिंदे यांच्याबाबत भाष्य केले आहे. काँग्रेससाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे बरेच कार्यकर्ते आहेत, मात्र ज्यांना जायचे ते जातील, असेही शिंदे यांनी नमूद केले.

राज ठाकरे-अमित शहा यांच्या भेटीवर सुशीलकुमार शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, हा निवडणूक प्रक्रियेमधील निरनिराळ्या पक्षांचा चालणारा भाग आहे. त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही.

मोहिते-पाटलांना ऑफर नाही

मोहिते-पाटील आमच्या पार्टीत नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलू. मोहिते-पाटील यांना सध्या तरी आमच्याकडून कोणती ऑफर नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश