(Photo-X/@MahaDGIPR)
महाराष्ट्र

शिंदे चार दिवसांपासून दरे गावी, चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे गावी मुक्कामी आहेत.

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे  गावी मुक्कामी आहेत. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला  शिंदे उपस्थित नव्हते. गेल्या आठवड्यात रविवारी  पंढरपूरचा  दौरा केल्यानंतर परस्पर गावी गेलेले शिंदे अद्याप  मुंबईत परतलेले नाहीत. शिंदे यांनी गेल्या तीन  दिवसांपासून एकही शासकीय बैठक घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या दरे मुक्कामाचे गूढ वाढले असून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या  चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या सहा बंडखोर खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत शिंदे आणि शहा यांच्यात राज्यातील राजकीय विषयांवर चर्चा झाली होती. तत्पूर्वी, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गट महायुती सरकारमध्ये  सहभागी होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.  

या पार्श्वभूमीवर  १९ जुलै ते २२ जुलै असे सलग चार दिवस शिंदेंनी आपल्या गावी मुक्काम ठोकल्याने  ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार गट महायुतीत सहभागी झाल्यास त्यांच्या पक्षाला वित्त आणि नियोजन खाते दिले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, हे खाते राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गटाचा विरोध आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बुधवारच्या  जयंतीच्या निमित्ताने  शिंदे यांनी एक्स या समाज माध्यमातून अजितदादांना अभिवादन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनाही आज समाज मध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अजितदादांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने  येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 'अजित स्मृती, अवीट स्मृती' या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारी हस्ते झाले. या कार्यक्रमाला शिंदे उपस्थित नव्हते, याकडे लक्ष वेधण्यात येत  आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Protest Delhi : कोंडी फुटली, चर्चा सुरू

पहिल्या यादीत केवळ ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; प्राप्तिकर विभागाकडून यादी न मिळाल्याने विलंब

Mumbai : तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

संतांचे पालखी सोहळे पंढरपुरात दाखल; ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका बंधू भेटीचा अपूर्व सोहळा

अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला : गोळीबारात एका पोलिसाला वीरमरण