महाराष्ट्र

कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी ड्रेस कोड; 'या' कपड्यांना बंदी

आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. एकविरा आईच्या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हि बंदी घालण्यात आली. ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकविरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी दिली आहे.

Swapnil S

भिवंडी : आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. एकविरा आईचे व मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हि बंदी घालण्यात आली असून ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकविरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी दिली आहे. कार्ला येथे आई एकविरा देवीच्या मंदिरात विश्वस्थ मंडळाच्या बैठकीत एकमताने ड्रेस कोड संदर्भात हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.

कार्ला येथील एकविरा आई ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून राज्यासह देशातील अनेक ठिकाणाहून भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात. मात्र काही भक्त अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात,त्यामुळे देवीचे व मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी विश्वस्थ मंडळाकडे आल्या असून अनेक भक्तांनी सोशल मिडयाद्वारे ड्रेस कोडसंदर्भात मागणी केली केली होती. भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्थ मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.

  • 'या' कपड्यांना बंदी

    शॉर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे, मिनीस्कर्ट, फाटक्या जीन्स, हाफ पँट व अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांना बंदी घालण्यात आली आहे.

  • 'या' कपड्यांना परवानगी

साडी, सलवार कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावेत ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे. धोतर, कुर्ता पायजमा, पँट शर्ट, टी शर्ट व इतर पारंपरिक कपडे ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे.

मंदिरातील कर्मचाऱ्यांना सूचना

एकविरा देवीच्या मंदिरात दर्शन घेताना येथील कर्मचारी भक्तांवर आरडा ओरड करत असून भक्तांशी वाद घालत असल्याच्या तक्रारी देखील विश्वस्थ मंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. मंदिरातील कर्मचाऱ्यांनी देवी भक्तांशी वाद न घालण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. एकविरा आईच्या भक्तांनी देखील देवीचे दर्शन घेतांना मंदिरातील सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील ट्रस्टचे प्रमुख विश्वस्थ खासदार बाळ्या मामा यांनी देवी भक्तांना केले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video