सर्व महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी ६ मे रोजी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे न्यायालयाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढची सुनावणी करू, असे न्यायालयाने म्हटले आहे.

प्रशासक राज

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे. मुंबई, पुण्यासह अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ३ ते ४ वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या निवडणुकांकडे लागले आहे. लोकसभेपाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यात प्रभाग फेररचनेचा मुद्दा आहे. त्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली नाही. राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते या दोघांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हव्या आहेत. परंतु काही मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी निर्णय झाला नाही. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता नाही. कारण होळीमुळे ९ ते १६ मार्च सर्वोच्च न्यायालयास सुटी आहे. त्यानंतर न्यायालयाकडून तारीख दिली जाईल त्या तारखेवर सुनावणी होईल. त्या तारखेला सुनावणी झाली नाही तर न्यायालयाला उन्हाळी सुट्टी लागेल. यामुळे हा विषय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Mumbai : मनोरी प्रकल्पाला CRZ ची मंजुरी; समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाला गती

सिडकोच्या ताब्यातील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार; २० वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय, नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना दिलासा

राज्यात बोगस दातांच्या डॉक्टरांना बसणार आळा; महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी

Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित

Thane : प्रक्रिया केलेले पाणी महापालिका विकणार; पाणीटंचाईसह अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटासाठी पालिका सज्ज