जालन्यात उपोषण करणाऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. पुरुष, महिला, लहान मुले जखमी झाले. शेतकरी शेतमजूर अनेकांवर लाठीहल्ला करण्यात आला. राजकारण्यांकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. आयाबहिणींवर लाठीहल्ला करण्याची नीती असेल त्यांच्या हातात सत्ता ठेवणार नाही, आपण या सगळ्यांचा शंभर टक्के पराभव करु, या लढाईसाठी आपण तयार राहीलं पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. ते जळगाव येथील सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीला सरकारला जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल केला. राज्यात सर्वत्र दुष्काळ असून जळगाव जिल्ह्यात देखील दुष्काळाच्या छायेत आहे. सध्या राज्यात महागाईस, बेरोजगारी यांसारखे असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत. चुकीच्या लोकांच्या हातात राज्य गेल्यामुळे हे झालं आहे, असा घाणाघात शरद पवार यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. शेतकरी आत्महत्या का करत आहेत, याचा तपास राज्यसरकारने करण महत्वाचं आहे. यावेळी त्यांनी १९८४-८५ चा दाखला दिला. ते म्हणाले, यासाली जळगाव ते नागपूर दिंडी काढण्यात आली. पहिल्या दिवशी हजार लोक होते. दुसऱ्या दिवशी २५, ००० लोक झाले. तर तिसऱ्या दिवशी ५० हजार लोक जमा झाले. या दिंडीत चौथ्या दिवशी एक लाख लोक जमा झाले. नागपूर पर्यंत जात लाखोंचा जत्था जमा झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचं राजकारणात महत्वाचं स्थान असंत. त्याला कुठलीही ठेच पोहचता कामा नये, असं आवाहन पवार यांनी केलं.
फोडाफोडीच्या राजकारणावर टीका
जळगाव येथील सभेत बोलताना शरद पवार यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीतील फुटीवर उघडपणे भाष्य केलं. ते म्हणाले. केंद्रात मोदी साहेबांचं राज्य आहे. पण मोदींनी काय केलं? नऊ वर्षात इतर राजकीय पक्ष फोडणे, शिवसेना फोडणे, राष्ट्रवादी फोडणे, सत्ता लोकांच्या बाजूने न वापरता इडीचा वापर करायचा, लोकांना वेठीस धरायचं काम भाजप करत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.