महाराष्ट्र

एमएमएस, एमसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा अर्जास मुदतवाढ, ३१ जुलैपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज; ११ ऑगस्टला ऑनलाईन परीक्षा

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत (सीडीओई) चालविण्यात येत असलेल्या एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) आणि एमसीए (मास्टर ऑफ काॅम्प्युटर ॲॅप्लिकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. तर ११ ऑगस्ट रोजी ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) या अभ्यासक्रमासाठी ७२० एवढी प्रवेश क्षमता असून एमसीए (मास्टर ऑफ काॅम्प्युटर ॲॅप्लिकेशन) या अभ्यासक्रमासाठी २००० एवढी प्रवेश क्षमता आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने सीडीओईच्या माध्यमातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी परवानगी दिली असून हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयात एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे.

हे दोन्ही अभ्यासक्रम युजीसी आणि एआयसीटी मान्यताप्राप्त आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या पात्रता, शूल्क, प्रवेश परीक्षेसंबंधातील अधिक तपशील मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून सादर करता येणार आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था