महाराष्ट्र

कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी आक्रमक; अजित पवारांसह व्यापारी दिल्लीला जाण्याची शक्यता

कांदा निर्यातबंदीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पीयूष गोयल यांची भेट घेतली

नवशक्ती Web Desk

केंद्र सरकारने कांदा निर्यावतील बंदी घातल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप निर्माण झाला आहे. काद्यांला प्रतिक्विंटल ३७०० रुपयांचा भाव मिळू लागला आणि केंद्रान कांदा निर्यात बंद केली. आता त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दिल्लीत यासंबंधीची महत्वाची बैठक सोमवारी पार पडणार आहे. या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री अजित पवार जाण्याची शक्यता आहे. तसंच कांदा निर्यातबंदीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पीयूष गोयल यांची भेट घेतली. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार करावा, अशी मागणी भारती पवार यांनी पीयूष गोलय यांच्याकडे यावेळी केली.

सोमवारी दिल्लीत पीयुष गोयल यांच्यासोबत कांदाप्रश्नावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील कांदा व्यापारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांद्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद आहेत. याप्रकरणी मंत्री पीयुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे. आता दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, निर्यातबंदी केल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. कांद्याची निर्यात सुरु असताना ५० रुपयांपर्यंत भाव मिळत होता.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत