महाराष्ट्र

नेमका कशामुळे कोसळला छत्रपती शिवरायांचा पुतळा? चौकशी समितीच्या १६ पानी अहवालात झाला खुलासा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आपला १६ पानी अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

Swapnil S

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आपला १६ पानी अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या चौकशी अहवालात पुतळ्याची चुकीची वेल्डिंग, अयोग्य डिझाईन व गंजामुळे पुतळा कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंच पुतळा उभारण्यात आला व त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित इतर नेतेमंडळी उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणानंतर आठ महिन्यांत पुतळा कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर टीकेची झोड उठवली. या पुतळा उभारण्याच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला. त्यामुळे या घटनेचे राजकीय पडसादही उमटले आहे.

भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमांडो पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्यांची चौकशी समिती तयार करण्यात आली होती. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता.

अहवालाचा अभ्यास करून दोषींवर कारवाई - सामंत

दरम्यान, अहवालात नमूद गोष्टींचा अभ्यास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप