Kudal : 'आपला बाजार' मॉलवर FDA ची धाड; व्यवसाय बंदची नोटीस 
महाराष्ट्र

Kudal : 'आपला बाजार' मॉलवर FDA ची धाड; व्यवसाय बंदची नोटीस

कुडाळ शहरातील नव्याने सुरू झालेल्या 'आपला बाजार' या मॉलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे. आवश्यक परवान्यांशिवाय मॉल सुरू करण्यात आल्याचे तपासणीत उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

Swapnil S

कुडाळ : कुडाळ शहरातील नव्याने सुरू झालेल्या 'आपला बाजार' या मॉलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे. आवश्यक परवान्यांशिवाय मॉल सुरू करण्यात आल्याचे तपासणीत उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी मोठ्या गाजावाजात या मॉलचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकल्याने कुडाळ शहरात एकच खळबळ उडाली. कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित तपासणीदरम्यान मॉलकडे अन्न व औषध प्रशासनाचे आवश्यक परवाने तसेच एफएसएसएआयचा वैध अन्न परवाना नसल्याचे निदर्शनास आले.

व्यवस्थापक अमोल सुतार यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मॉलमधील गुळाच्या साठ्यातून काही नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
अभय चंदनशिवे, अन्न सुरक्षा अधिकारी

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन

Thane : झेडपीच्या शाळांकडे पालकांचा ओढा; इयत्ता पहिलीत ८ हजार २८० विद्यार्थ्यांचा प्रवेश

कोस्टल रोड प्रकल्पातील बोगदा 'फायर प्रूफ'; 'वॉटर मिस्ट टर्बाइन' वाहन तैनात करणार; BMC करणार ६ कोटी ३२ लाख रुपये खर्च