महाराष्ट्र

‘बेकायदेशीर’ सरकार घरी बसविण्याची जनतेत भावना – बाळासाहेब थोरात

लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

Swapnil S

मुंबई : लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने लोकसभा निवडणुकीत उत्तर दिले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे. महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत. या महिला खासदार भाजप सरकारला धारेवर धरत आहेत. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच नरेंद्र मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे.

‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सांगा. मविआच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला सांगा, असे ते म्हणाले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक