महाराष्ट्र

मंत्री कोकाटेंप्रकरणी अंतिम निर्णय १ मार्चला

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सध्या तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, पण याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालय १ मार्चला अंतिम निर्णय देणार आहे.

Swapnil S

नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सध्या तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, पण याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालय १ मार्चला अंतिम निर्णय देणार आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. सरकारी पक्षाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. सरकारी वकिलांनी आपली भूमिका मांडत शिक्षेच्या स्थगितीला विरोध दर्शविला. त्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांच्या वकिलांनी देखील शिक्षेला स्थगितीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने कोणताही निकाल न देता, येत्या १ मार्चला पुढील सुनावणी होईल, असे सांगितले.

कृषिमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला अद्याप स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत कृषिमंत्री कोकाटे यांची अस्वस्थता कायम असणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सभापतींवर कारवाईसाठी दबाव वाढविला जाण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या सध्याच्या मंत्रिमंडळात शिक्षा झालेले कोकाटे हे पहिलेच मंत्री आहेत. त्यामुळे महायुतीपुढे राजकीय पेच वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून या संधीचा लाभ उठविण्यासाठी मंत्री कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

'शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास माणिकराव कोकाटे यांच्यावर आमदार अपात्रतेची टांगती तलवार कायम राहणार आहे. त्यामुळे १ मार्च रोजी न्यायालय काय निर्णय देणार? यावर माणिकराव कोकाटे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार