महाराष्ट्र

फिनलंडची शिक्षणपध्दती भारतात उपयुक्त

प्रतिनिधी

भारतात नवीन शिक्षणपध्दती विकसित होत असताना फिनलंड सारख्या शिक्षणक्षेत्रात उत्तुंग असलेल्या देशाकडून त्यांचे शिक्षणाचे तंत्र अवलंबून त्याचा भारतासाठी उपयोग केल्यास भारतीय शिक्षणपध्दतीत अमूलाग्र बदल होईल.” असे उद्गार माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी काढले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटी, पुणे व कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन (सीसीई फिनलंड)तर्फे शिरीन कुलकर्णी व हेरंब कुलकर्णी लिखित ‘शिक्षणगंगा - फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.

सीसीई फिनलंडचे शिक्षणतज्ज्ञ नेल्ली लुहिवूरी, शिक्षणतज्ज्ञ ख्रिस्तोफ फेनेव्हेसी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सीसीई फिनलंडचे संस्थापक व लेखक हेरंब कुलकर्णी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. रत्नदीप जोशी व धनिक सावरकर हे उपस्थित होते.

डॉ. रत्नदीप जोशी यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन अमेय खरे यांनी केले. तर धनिका सावरकर यांनी आभार मानले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत