महाराष्ट्र

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या ‘रोड शो’मध्ये आग; इमारतीवरील मोबाईल टॉवर खाक; जीवितहानी नाही

राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा रणधुमाळी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या गोदावरी काठावर सभा घेतल्यानंतर पुण्यात रोड शोसाठी ते दाखल झाले असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आगीची घटना घडली.

Swapnil S

पुणे : राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा रणधुमाळी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या गोदावरी काठावर सभा घेतल्यानंतर पुण्यात रोड शोसाठी ते दाखल झाले असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आगीची घटना घडली.

भोसरीत मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू असताना ही घटना घडली, येथील रोड शो दरम्यान फटाके वाजवताना एका इमारतीला आग लागली. त्यानंतर, तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आगीच्या घटनेत इमारतीवरील मोबाईल टॉवर जळून खाक झाल्याचीही माहिती आहे. या घटनेनं परिसरात गोंधळ उडाला होता.

दरम्यान, आपल्या रोड शो वेळी मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड पोलिसांवर संतापल्याचे दिसून आले. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना रोखण्यास दोर लावला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेला दोऱ्यांचा वेढा काढायला सांगितला.

मुंबईसह राज्यातील २६-२७ मनपा आम्ही जिंकू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास

BMC Election : बेस्ट, एसटीलाही लागली इलेक्शन ड्युटी; प्रवासी सेवेवर गंभीर परिणाम होणार

'जलद डिलिव्हरी' आता होणार आरामात; झेप्टो, ब्लिंकिट, स्विगीबाबत केंद्र सरकारचा निर्णय

भटका कुत्रा चावल्यास नुकसानभरपाई द्यावी लागेल; सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

बिनविरोध उमेदवारांबाबत आज सुनावणी; मनसेकडून कोर्टात याचिका