प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

चंद्रपुरातील तलावात पाच जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जण

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Swapnil S

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे हे पाच तरुण रहिवाशी आहेत. गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

मृतांची नावे जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे आहे. मुलांनी घोडाझरी तलावावर पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास सहा मुले पोहण्यासाठी तलावात उतरली. आर्यन हेमराज हा मुलगा कसाबसा वाचला. परंतु जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे ही पाचही मुले तलावात बुडाली. बुडालेल्या पाच जणांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत, तर एका मित्राच समावेश आहे.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ

मुंबईत हाय अलर्ट! ३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी; 'लष्कर ए जिहादी'चा पोलिसांना संदेश

मला विचारून 'जीआर' काढल्याचा गैरसमज पसरवू नका! मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

अंजना कृष्णा धमकी प्रकरण : अजितदादांची सारवासारव; अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता!