संजय करडे
महाराष्ट्र

काशिद समुद्रात बुडणारे पाच जण बचावले

Swapnil S

मुरूड-जंजिरा : मुरूडमधील काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेले पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते धडपडत असल्याचे पोलीस नाईक चेतन वेळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्वरित जीवरक्षकांच्या मदतीने पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. हे सगळे पर्यटक पुण्यातील रहिवासी आहेत.

पुणा येथील राजेश्री मिश्रा, संजय मिश्रा, आयुशी मिश्रा, बाही मिश्रा आणि सौम्य मिश्रा हे सगळे पुणे येथील गणपती हौसिंग सोसायटी हडपसर येथे राहत असून हे पाच जण आपल्या परिवारासह फिरण्यासाठी मुरूड-काशिद या ठिकाणी आले होते. सायंकाळदरम्यान जवळ असणाऱ्या समुद्रात सहकुटुंब पोहण्यासाठी उतरले होते.

पाण्याचा आनंद घेण्याच्या नादात हे पाचजण खूप पुढे निघून गेले. त्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने काठावर येण्यासाठी पाण्यात धडपडत असल्याचे पोलीस चेतन वेळे यांना निदर्शनास आले. त्याचवेळी जीवरक्षक राकेश रक्ते, शिवम लाड, सय्यम भोंबु, सुयोग महाडिक यांनी समुद्रात उड्या मारून त्या पाचही जणांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी पर्यटकांनी पोलिसांचे, जीवरक्षकाचे व स्थानिक ग्रामस्थांचे आभार मानून कौतुक केले.

यावेळी पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी पर्यटकांना आवाहन केले की समुद्रात पोहण्यासाठी उतरताना जीवरक्षक व पोलिसांकडून समुद्राची योग्य ती माहिती घेऊन व आपल्या स्वतःची माहिती देऊन समुद्रात सेफ्टी जॅकेट घालून पोहण्यासाठी उतरावे धोक्याच्या ठिकाणी उतरू नये. पर्यटकांनी उतावळेपणा करू नये आपला जीव लाख मोलाचा आहे, असा संदेश मुरूड पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी पर्यटकांना दिला आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत