हरिश्चंद्र चव्हाण फेसबुक
महाराष्ट्र

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण कालवश

दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण ७३ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी राहत्या गावी प्रतापगड सुरगाणा येथे करण्यात आला.

Swapnil S

लासलगाव : दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण ७३ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी राहत्या गावी प्रतापगड सुरगाणा येथे करण्यात आला.

नाशिक येथून पार्थिव येत असताना सुरगाणा, सुर्यगड, प्रतापगड येथे नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले. सुरगाणा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, माजी आमदार जे.पी.गावीत, माजी आमदार धनराज महाले, डांगचे माजी आमदार मंगळभाई गावीत, सोनालिराजे पवार, रत्नशीलराजे पवार, नगराध्यक्ष भरत वाघमारे, रमेश थोरात, धनराज कानडे, यादवधुम, सखाराम भोये, मोहन गांगुर्डे, चिंतामण गावीत, गोपाळ धुम, जनार्दन भोये, आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष अशोक बागुल, राम चौरे, रतन चौधरी, उत्तम वाघमारे, एन. डी. गावीत, धनराज कानडे, भावडू चौधरी, सुभाष चौधरी, हरिभाऊ भोये, आजी माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच दिंडोरी मतदार संघातील घाटमाथ्यावरून तसेच तालुक्यातून आलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, नरहरी झिरवाळ, धनराज महाले, जे. पी.गावीत आदींनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी चव्हाण यांचे शालेय मित्र असलेले राजकीय क्षेत्रातील कट्टर विरोधक मानले जाणारे माजी आमदार जे.पी.गावीत यांना बोलतांना भावना अनावर झाल्या होत्या.

2006 Mumbai Local Train Blasts : हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र शासनाचे सुप्रीम कोर्टात आव्हान; २४ जुलैला सुनावणी

‘...तर तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू’; अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा, चीन आणि ब्राझिललाही धमकी

Kalyan : ''तुम्ही जरा थांबा'' बोलल्याने परप्रांतिय तरुणाकडून मराठी मुलीला बेदम मारहाण; शिवगाळ करत विनयभंग| Video

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत कोण? 'ही' नावे चर्चेत, महाराष्ट्रातील नेत्याचं नावही आघाडीवर

दिव्या देशमुख, कोनेरू हम्पीची ऐतिहासिक भरारी! महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताकडून पहिल्यांदाच 'अशी' कामगिरी