महाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे करण्यासाठी समिती स्थापन

नवशक्ती Web Desk

सातारा: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठचे उपकेंद्र सातारा येथे होण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी संघटना यांची मागणी होती. यासंदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठा प्रशासन, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली होती.आता या उपकेंद्रासाठी व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. आर. व्ही.शेजवळ यांचे अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत केली असून त्यात डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. श्रीमती वर्षा मैंदर्गी, अमित कुलकर्णी, अमित जाधव , सारंग कोल्हापुरे व रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

सातारा उपकेंद्रासाठी या समितीमार्फत जागा, अभ्यासक्रम व मनुष्यबळ यांचे धोरण ठरवून त्याचाअहवाल तयार करण्यात येणार आहे.त्यानंतर विद्यापीठ प्रशासन या अहवालानुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. सातारा जिल्हयात महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, सेवक वर्ग आणि संस्थाचालक यांना विविध प्रशासकीय कामे, गुणपत्रके, फेरमुल्यांकण,पदवी प्रमाणपत्रे, मायग्रेशन आदी कामांकरिता वारंवार कोल्हापूरला जावे लागते. सातारा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने जिल्ह्यातील शिरवळ, म्हसवड, फलटण, महाबळेश्वर या शहरांपासून शिवाजी विद्यापीठ हे एकेरी अंतर सुमारे १५० ते १९० किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे एवढा दूरवरचा प्रवासकरून विद्यापीठात छोट्या कामासाठीही जावे लागते. यात पूर्ण दिवस प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे . महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये मोठ्या विद्यापीठांची उपकेंद्रे - उपपरिसर स्थापन करण्याची तरतूद केली आहे. सातारा येथे उपकेंद्र झाल्यास विविध प्रकारचे अभ्यासक्रमही याठिकाणी सुरु होणार आहेत तसेच संशोधनात्मक प्रकल्पही सुरु होण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात सातारा उपकेंद्र झाल्यास त्याचे रूपांतर विद्यापीठातही होऊ शकते.सदर समितीची लवकरच बैठक होणार असल्याचे सदस्यांनी सांगितले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस