महाराष्ट्र

चैनीसाठी दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, ११ दुचाकी जप्त

या टोळीतील दोघे अल्पवयीन मुलांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली

शेखर धाेंगडे

चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांने बुधवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून एकूण ११ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत . चैनीसाठी दुचाकी चोरणार्या चौघांच्या टोळीला बुधवारी दुपारी चित्रनगरी जवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचुन पकडले. त्यातील दोघे अल्पवयीन असून रवी पवार, सुनील वळकुंजे अशी ताब्यात घेतलेल्या दोन अन्य तरुणांची नावे आहेत, पोलिसांनी या टोळीकडून चोरीतील 9 दुचाकीसह एकूण 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीतील दोघे अल्पवयीन मुलांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. दरम्यान पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग १० पदरी होणार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अजितदादांनी जपली विचारधारा! तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले

बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी