महाराष्ट्र

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

Swapnil S

विशेष प्रतिनिधी

मुंबई: भाईंदर पूर्वेला नर्मदा नगर परिसरातील सागर सम्राट इमारती मध्ये राहणाऱ्या अनुष्का कबसुरी (वय १७ वर्ष) या बारावीच्या विदयार्थिनीने बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं राहत्या घरात पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळणार अशी तिला खात्री होती, परंतु ८७ टक्के गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केली आहे.

मृत विद्यार्थिनी मालाडच्या सराफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून गुण मिळाल्यानं तिला धक्का बसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस