संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

सरकारच्या आशीर्वादानेच गुंडांचे पोलिसांवर हल्ले; कायदा-सुव्यवस्थेवरून नाना पटोले यांची टीका

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या घरात दरोडा याचा अर्थ गुंडांचा हैदोस आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या घरात दरोडा याचा अर्थ गुंडांचा हैदोस आहे. गुंडांची ऐवढी हिंमत ही महायुती सरकारच्या आशीर्वादामुळे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

भाजप युती सरकारने पोलिसांना कमजोर केले आहे. या सरकारच्या काळात गुंडांना सरकारी ताकद मिळली आहे. काही गुंड मुख्यमंत्र्यांसोबत फिरत आहेत तर काहींना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली, काहींना उपचाराच्या नावाखाली हॉस्पिटलमध्ये भरती करुन फाइव्हस्टार सेवा पुरवली जात आहे. सरकारचा आशीर्वाद असल्यानेच गुंड पोलिसांवर हल्ला करण्याची गुंडांची हिंमत वाढली आहे. या सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही, सरकार बेशरम असून जनतेला वाऱ्यावर सोडून सर्व बाजूंनी लुटण्याचे काम सुरु आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावच्या कार्यक्रमातही खोटे बोलले. महिलांच्या संदर्भातील शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे दोन वर्षांपासून पडून आहे तो मंजूर केला जात नाही आणि गप्पा महिला सुरक्षेच्या मारत आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी योजनांबद्दल बोलले पण पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल एक शब्दही काढला नाही. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला पंतप्रधानांकडे काहीच अर्थ नाही असे दिसले.

भेट होती की धाड?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी काही लोकांसह चाकण येथील मर्सिडीज बेंझच्या प्रकल्पाला अचानक भेट देऊन कंपनीने पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. या भेटीमागे कदम यांचा काही उद्देश होता का, नियमानुसार ही भेट दिली की आणखी काही कारण होते. राज्यातून उद्योग बाहेर चालले आहेत, बेरोजगारी वाढत आहे. मर्सिडीज सारख्या कंपन्या राज्यातून गेल्या तर मोठे नुकसान होऊ शकतो. ही भेट होती की धाड होती, असा सवाल उपस्थित करत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काय करतात असेही पटोले म्हणाले.

पैसा, बळ, भीतीचा वापर करून पळवापळवीचे राजकारण सुरू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

परळीत शिंदेसेना- ‘एमआयएम’ युती; ठाकरेंनी हिंदुत्व सोडले म्हणणाऱ्या शिंदेंनी बोलणे टाळले

अंबरनाथमध्ये शह-काटशह! शिंदेसेनेने भाजपवर डाव उलटवला; राष्ट्रवादीचे नगरसेवक आता शिंदे सेनेच्या गळाला

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी याचिका फेटाळली; उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईचा ‘वाली कोण’?