महाराष्ट्र

बीड : विवाहबाह्य संबंध, बक्कळ पैशांची मागणी; अखेर माजी उपसरपंचाने संपवलं आयुष्य, प्रेयसी नर्तिकेला अटक

गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३५) यांच्या संशयास्पद मृत्यूने जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. मंगळवारी (दि. ९) रात्री सासुरे गावात कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

नेहा जाधव - तांबे

बीड येथील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३५) यांच्या संशयास्पद मृत्यूने जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. मंगळवारी (दि. ९) रात्री सासुरे गावात कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पिस्तूल मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला अटक केली आहे.

कारमध्ये पिस्तूलासह मृतदेह

९ सप्टेंबरच्या सकाळी लुखामसला गावाजवळ शेतात काळ्या रंगाची चारचाकी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पाहणी केली असता गाडीतच गोविंद बर्गे मृतावस्थेत सापडले. त्यांच्याजवळ पिस्तूल असल्याने त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली असावी, असे दिसून आले.

नर्तिकेसोबत विवाहबाह्य संबंध

गोविंद बर्गे यांचे लग्न झालेले असून त्यांना दोन मुले आहेत. तरीही गेल्या वर्षी २०२४ मध्ये धाराशिवमधील एका कलाकेंद्रात त्यांची पूजा गायकवाड (वय २१) हिच्याशी ओळख झाली. ही ओळख प्रेमसंबंधात रुपांतरित झाली. पूजाच्या प्रेमात पडलेल्या बर्गेंनी तिला सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल फोन, रोख रक्कम, तसेच तिच्या नातेवाईकांच्या नावावर जमीनसुद्धा केली होती. तिच्या भावाला बाईक आणि फोनही दिला होता. तिला कलाकेंद्र उभारण्यातही मदत केली.

मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात वाद वाढले. पूजाने बर्गेंकडे गेवराईतील बंगला व पाच एकर शेती तिच्या भावाच्या नावावर करण्याची मागणी केली होती. मागणी न मानल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी तिने दिल्याचे बर्गे यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या दबावामुळेच बर्गे मानसिक नैराश्यात गेले होते.

मृत्यूपूर्वीची शेवटची भेट

घटनेच्या आदल्या रात्री बर्गे हे पूजाशी समेट करण्यासाठी तिच्या सासुरे गावात गेले होते. मात्र, पूजाने त्यांच्याशी नीट बोलणे टाळल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या भेटीनंतर निराश झालेल्या बर्गे यांनी आपल्या कारमध्ये जाऊन दरवाजा बंद केला. त्यानंतर पिस्तूलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

नर्तिकेला अटक

या प्रकरणात पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिला अटक केली आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून बर्गे यांचा मृत्यू खरोखरच आत्महत्या होती की यामागे इतर कुठला गुन्हा दडला आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती