महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला सर्वाधिक यश; दोन्ही युतींमध्ये अटीतटीचा सामना

प्रतिनिधी

महाराष्ट्रात आज ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाले. सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने कोणती ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाच्या झेंडा फडकतो, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. (सदर आकडेवारी ही ८ वाजेपर्यंतची) या निकालानंतर भाजपने सर्वाधिक १९६६ ग्रामपंचायतींवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १४४६, शिवसेना शिंदे गटाने ८०२, काँग्रेसने ८३८ तर शिंदे गटाने ६६१ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. तसेच, काही इतर आघाड्यांनी १०६८ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. राज्यातील ६१६ ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्या आहेत.

तब्बल ३५ जिल्ह्यांमध्ये ७७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी सरासरी ७४ टक्के मतदान झाले होते.

काही ठराविक निकाल ज्यांनी लक्ष वेधून घेतले :

> उस्मानाबाद जिल्ह्यातील कावळेवाडी आणि पूर्वी ग्रामपंचायतमध्ये 'आप'ने विजय मिळवला आणि ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच ‘आप’चा प्रवेश झाला आहे.

> पालघरमध्ये गुंडले ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला. मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी निवड झाली. सातपाटीमध्येही मनसेचे आठ उमेदवार निवडून आले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आनंद व्यक्त करताना म्हणाले की, "विजयाबद्दल नक्कीच आनंद आहे, आता हा आकडा वाढवत जावो."

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल