महाराष्ट्र

गुंडाराज सरकारची लवकरच पोलखोल होणार -जयंत पाटील; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नगरमध्ये आढावा बैठक

Swapnil S

अहमदनगर : सरकार आणि गुंडागर्दी करणाऱ्या लोकांमध्ये जवळचे संबंध असून हे संबंध आता उघड झालेले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समावेत व्हायरल झालेले गुंडांचे फोटो यामुळे आता जनतेला हे सरकार नेमके जनतेचे सेवेसाठी की गुंडाच्या रक्षणासाठी यांची शंका निर्माण झाली आहे. यामुळे या गुंडाराज सरकारची लवकरच पोलखोल होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची आढावा बैठक जयंत पाटील यांचे उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्ता तनपुरे, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रदेश सचिव प्रताप ढाकणे, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेनेचे संदेश कारले, माजी महापौर बाबासाहेब भिटे, संदीप वर्पे, आदिसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, राज्यातील गुंड प्रवृत्ती व सत्ताधारी यांच्यातील संबंध आता उघड झाले आहेत, त्यामुळे जनतेला जो संदेश मिळायचा तो मिळाला आहे. अशा प्रकारचे सत्ताधारी असण्यापेक्षा जनतेने हिताचे व स्वच्छतेचे राजकारण व समाजकारण करणाऱ्या प्रतिनिधींना निवडून द्यावे असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात येत्या नऊ तारखेला बैठक होणार असून, यात नगरच्या जागे संदर्भात उमेदवार जाहीर करून त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, असे सांगितले.

यावेळी राजेंद्र फाळके, आमदार तनपुरे व अभिषेक कळमकर यांनी मनोगत व्यक्त केले, तर तालुकानिहाय आढावा घेऊन जोमाने पक्ष वाढविण्यास मदत करावी, असे आवाहन केले. या बैठकी प्रसंगी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. बैठकीस राहुरी, नगर, श्रीरामपूर, संगमनेर येथील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अनेक पक्षप्रेमी उपस्थित होते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त