महाराष्ट्र

मराठा आंदोलकांविरोधात गुणतरत्न सदावर्ते हायकोर्टात ; दाखल याचिकेवर ८ नोव्हेंबर रोजी सुनावणी

नवशक्ती Web Desk

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी करता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण छेडलं आहे. असं असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता यावर ८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी २५ ऑक्टोबर पासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण सुरु केल्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायाललाय याचिका दाखल केली होती. सदावर्तेंनी आवाहन दिल्यानंतर उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकू शकलं नाही. आता पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने गुणरत्न सदारर्ते यांनी यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.

आरक्षणासाठी लक्षा उभारल्यानंतर गुणरत्न सदावर्ते हे सातत्याने मराठा समाजावर टीका करत होते. त्यामुळे मराठा समाजाचा त्यांच्यावर रोष होता. त्यांना मराठा समाजावर न बोलण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. हिंसक वातावरण निर्माण करणार्या सदावर्ते यांच्या विरोधात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

ठाणे, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच

‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा