रवी राणा आणि नवनीत राणा यांचे संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

हनुमान चालीसा पठण प्रकरण : कायदा सर्वांना समान; कोर्टाने रवी राणा यांना फटकारले

कायदा हा सर्वांसाठी समान आहे याचे भान ठेवा, सुनावणीला वेळेवर हजर रहा अशी सक्त ताकीदच न्यायालयाने रवी राणा यांना दिली. तर, नवनीत राणा यांनी आजारी असल्याचे कारण देत दांडी मारली. याची दखल घेत न्यायालयाने...

Swapnil S

मुंबई : हनुमान चालीसा पठण प्रकरणात सत्र न्यायालयाने बुधवारी अपक्ष आमदार रवी राणा यांना चांगलेच फटकारले. कायदा हा सर्वांसाठी समान आहे याचे भान ठेवा, सुनावणीला वेळेवर हजर रहा अशी सक्त ताकीदच न्यायालयाने रवी राणा यांना दिली. तर, नवनीत राणा यांनी आजारी असल्याचे कारण देत दांडी मारली. याची दखल घेत न्यायालयाने दोघांनाही पुढील तारखेला वेळेवर हजर राहण्याची सक्त ताकीद दिली.

गेल्यावर्षी एप्रिलमध्ये राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ममातोश्रीफ बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खार पोलिसांनी राणा दाम्पत्या विरुद्ध सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. त्यानंतर राणा दापत्यांचा दोषमुक्ततेचा अर्ज न्यायालयाने फेटाळताना आरोप निश्चितीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

या खटल्याची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुरू आहे. मागील सुनावणीच्या वेळी निवडणुकीचे कारण देत नवनीत यांनी गैरहजेरी लावली होती. बुधवारी त्यांनी आजारी असल्याचे कारण देत पुन्हा सूट मागितली. त्यांच्यातर्फे ॲड. शब्बीर शोरा यांनी अर्ज केला. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली; मात्र रवी राणा उशिराने हजर झाल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. कायद्यापुढे सर्व समान आहेत. वेळेचा नियम सर्वांना सारखाच लागू होतो. न्यायालयीन कामकाजाच्या वेळेचे भान ठेवून हजेरी लावा, अशी तंबी देत सुनावणी २ जुलैपर्यंत तहकूब ठेवली.

नवनीत यांनी दांडी मारल्याने आरोप निश्चिती लांबणीवर

न्यायाधीश राहुल रोकडे यांनी डिसेंबर महिन्यात दोघांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला. दोघांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट करत आरोप निश्चितीसाठी सुनावणी निश्चित केली होती; मात्र दोघांनी अधूनमधून दांडी मारण्याचे सत्र सुरू ठेवल्याने आरोप निश्चिती लांबणीवर पडली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी