हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ 
महाराष्ट्र

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Swapnil S

राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतांची रविवारी पाहणी केल्यानंतर सपकाळ यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. ‘उभी पिके डोळ्यांदेखत जळून खाक होत असताना, सरकार मात्र बैठकांचा खेळ मांडून मदत देण्यास टाळाटाळ करत आहे,’ असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात ५ ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीचे पंचनामे केले जातील असे स्पष्ट केले होते. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एनडीआरएफ) मदत येईपर्यंत राज्य सरकार स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.

मुहूर्ताची वाट नको

यावर सपकाळ म्हणाले, ‘राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पिके पुरती वाळली आहेत. अशा गंभीर संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने कुठल्याही मुहूर्ताची वाट पाहू नये."बुलढाण्यातील एका तरुण शेतकऱ्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, कोरड्या दुष्काळामुळे २० एकरांतील सोयाबीनचे पीक वाया गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या शेतकऱ्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांना पाहणीसाठी आमंत्रित केले होते, मात्र प्रशासनातील कुणीही तिथे फिरकले नाही. दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण न करता सरकारने शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

काँग्रेसच्या 'ताठ कण्या'चा असाही इतिहास...

आजचे राशिभविष्य, २२ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल