'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

HIV, सिफिलिस तपासणी अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा रक्तपेढ्यांना इशारा

रक्त पिशवीची एचआयव्ही, सिफिलिस, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी तपासणी अनिवार्य करण्यात आले आहे तसेच स्वतंत्र क्वारंटाईन व्यवस्था, नियमित सेल्फ-ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : रक्त पिशवीची एचआयव्ही, सिफिलिस, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी तपासणी अनिवार्य करण्यात आले आहे तसेच स्वतंत्र क्वारंटाईन व्यवस्था, नियमित सेल्फ-ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील रक्तपेढ्यांनी नियमांचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

राज्यातील काही रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांकडून रक्त सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयातही नियमांची पायमल्ली होत असल्याचे उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्व परवानाधारक रक्त केंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांसाठी प्रथमच सर्वसमावेशक ‘कॉम्प्लायन्स ऑर्डर’ जारी करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

तपासण्यांमध्ये अनेक रक्तकेंद्रांमध्ये औषधे व प्रसाधने नियम, १९४५ मधील ‘शेड्यूल एफ’ अंतर्गत असलेल्या अनिवार्य अटींचे पालन होत नसल्याचे निदर्शनाला आल्याने एफडीएला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे रक्त संकलनापासून रक्तवितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर एकसमान आणि कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.

प्रशिक्षित मनुष्यबळ बंधनकारक

नव्या आदेशानुसार प्रत्येक रक्तपिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, सिफिलिस आणि मलेरिया यांसाठी अनिवार्य तपासणी, योग्य तापमानात रक्तसाठवण, स्वतंत्र क्वारंटाईन व्यवस्था, नियमित सेल्फ-ऑडिट, ई-रक्तकोश पोर्टलवर दररोज माहिती अद्ययावत करणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता बंधनकारक करण्यात आली आहे.

उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही

सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण रक्त मिळणे हा प्रत्येक रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही रक्तकेंद्राची गय केली जाणार नाही. राज्यातील सर्व रक्तकेंद्रांनी तातडीने आपल्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

या नियमांचे पालन बंधनकारक

अनुसूची ‘एफ’, भाग बारा-बी नुसार आवश्यक पायाभूत सुविधा, समुपदेशन कक्ष, गुणवत्ता नियंत्रण विभाग व रक्तघटक प्रक्रिया सुविधा उपलब्ध ठेवणे, नियमांनुसार पात्र वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक पर्यवेक्षक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचारिका व समुपदेशकांची नियुक्ती करणे. २०२० मध्ये सुधारित रक्तदाता निवड निकष व तात्पुरत्या/कायमस्वरूपी अपात्रतेचे निकष काटेकोरपणे लागू करणे, रक्त व रक्तघटकांची योग्य तापमानात साठवण, कोल्ड चेन राखणे व संशयित रक्तपिशव्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन व्यवस्था ठेवणे, रक्तपिशव्यांचे नियमानुसार लेबलिंग, नोंदींचे विहित कालावधीसाठी जतन व रक्तघटक निर्मितीसाठी विहित कार्यपद्धतींचे पालन करणे, प्रत्येक रक्तकेंद्राने नियमित स्वयं-अनुपालन तपासणी करून विहित कार्यपद्धतीच्या अनुपालनाबाबत खात्री करणे, रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे, आपत्कालीन सुविधा, रक्तवाहतूक व शिबिरानंतरची अहवाल प्रणाली निश्चित करणे, ई-रक्तकोश पोर्टलवर रक्तसाठा व संबंधित माहिती दररोज अद्ययावत करणे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी