@ANI
महाराष्ट्र

Shivsena Thackeray Group : आजी-माजी पालकमंत्र्यांसह पोलिसांचा नाशिक ड्रग्ज रॅकेटमध्ये समावेश ; संजय राऊतांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

याविरोधात २०ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारीत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं

नवशक्ती Web Desk

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एमडी ड्रग्ज प्रकरणावरुन आकम्रक भूमिका घेतली आहे. याविरोधात २०ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारीत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ड्रग्ज माफियांवर कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरले व वेळ आल्यास मंत्र्यांच्या गाड्या अडवून नाशिक बंद करु, असा इशारा देत नाशिककरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शुक्रवारी (१३ ऑक्टोबर ) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी ड्रग्ज प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निशाणा साधला. धार्मिक शहर असलेलं नाशिक आता गुन्हेगारीचा अड्डा बनला असून ड्रग्ज माफिया ही नवीन ओळख निर्माण झाली आहे. गुजरातमधून नाशिकमध्ये ड्रग्ज येत असून नाशिकचे आजी-माजी पालकमंत्री व पोलिसदेखील या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोर संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत केला.

नवीन पिढी ड्रग्जच्या माध्यमातून उद्धवस्थ होत आहे. त्यामुळे सरकारला जाग आण्यासाठी व नाशिक वाचवण्यासाठी ऑक्टोबरला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शहर ज्या कारणांनी गाजत आहे ते शहराच्या संस्कृतीला शोभनार नाही. शाळा महाविद्यालयांना ड्रग्जच्या विळखा पडल्याने पालक अस्वस्थ आहेत. ड्रग्जच्या आहारी गेल्याने अनेक मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती, घरदार विकुन तरुण ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. याला जबाबदार कोण असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.

ड्रग्ज प्रकरणावर बोलताना राऊत पुढे म्हणाले की, या प्रकरणात सहभागी असलेल्यांची यादी देखील आमच्याकडे असून ती लवकरच जाहीर करु, असा इशारा खासदार राऊत यांनी दिला. बरबाद होणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही. असं देखील राऊत म्हणाले.

नाशिकचे नागपूर होऊ देणार नाही

तरुणांना वाचवण्यासाठी मोठे आंदोलन उभं करण्यासाठी आमचा इशारा मोर्चा असल्याचं राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले तर राज्यातील गुन्हेगारी वाढते. फडणवीसांच्या कार्यकाळात गुन्हेगारांना पाठिशी घातले जाते.परंतु आम्ही नाशिकचे नागपूर होऊ देणार नाही, असं राऊत म्हणाले.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास