अमित शहा  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

गृहमंत्री अमित शहा आज त्र्यंबकेश्वरमध्ये

केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शहा हे शुक्रवारी (दि. २४) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट देणार आहेत.

Swapnil S

नाशिक : केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शहा हे शुक्रवारी (दि. २४) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट देणार आहेत. अमित शहा शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करतील. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा होणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर ते हेलिकॉप्टरने मालेगाव तालुक्यातील अजंग येथे व्यंकटेश्वरा सहकारी वीज आणि कृषी प्रक्रिया लिमिटेडतर्फे आयोजित सहकार परिषद आणि विविध कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा शनिवारी असून आदल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येणार असल्याने त्यांच्या दर्शनाचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये अमित शहा आले असता त्र्यंबकेश्वरला येणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नव्हते. त्यानंतर आता ते यात्राकाळात त्र्यंबकेश्वरची वारी करणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११.५५ वाजता अमित शहा यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार असून, बीएसएफच्या हेलिकॉप्टरने ते त्र्यंबककडे प्रस्थान करतील. मंदिरातील पूजेसाठी वीस मिनिटांचा कालावधी आरक्षित असणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता ते हेलिकॉप्टरने मालेगावकडे रवाना होतील. दुपारी दोनला गृहमंत्री शहा हे मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह फर्मला भेट देणार आहेत. याठिकाणी सहकार परिषद आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीनला ते ओझर विमानतळावरून बीएसएफच्या विमानाने मुंबईकडे परततील.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक