महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद पॅटर्न, सगेसोयरे प्रारूप अंतिम टप्प्यात; ३० सप्टेंबरला बैठक

Swapnil S

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सगेसोयरेबाबत काढावयाच्या अंतिम अधिसूचनेचे प्रारूप तयार करण्याविषयी तसेच हैदराबाद, मुंबई व सातारा गॅझेटबाबत निवृत्त न्या. गायकवाड व न्या. शिंदे यांचा समावेश असलेल्या सल्लागार मंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. सगेसोयरे अधिसूचनेबाबत प्रारूप अंतिम टप्प्यात असून ३० सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी बैठकीनंतर दिली.

हैदराबाद, सातारा व मुंबई गॅझेटबाबत झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत करण्यात येईल व त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा