महाराष्ट्र

‘पिंक सरडा’ बारामती सोडणार तर..! संजय राऊतांची अजित पवारांवर टीका

सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची बहिण आहे. बहिणीने बारामतीत करून दाखवले आणि भाऊ पिंक झाला. आता म्हणे बारामती सोडणार आहे. म्हणजे सरडा बारामती सोडणार, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली.

Swapnil S

मुंबई : सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची बहिण आहे. बहिणीने बारामतीत करून दाखवले आणि भाऊ पिंक झाला. आता म्हणे बारामती सोडणार आहे. म्हणजे सरडा बारामती सोडणार, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली.

राऊत म्हणाले की, षण्मुखानंद हॉल हा आमच्यासाठी वानखेडे मैदान आहे. आजच्या मविआच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ओपनिंग बॅटिंग केली. वर्ल्ड कप जिंकला. आता महाराष्ट्र जिंकायचा आहे. लोकसभा निवडणुकीत ५६ इंच छातीची हवा काढली.

महाविकास आघाडीत वाद - भांडणे नाहीत. तसेच असते तर लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नसते. ५० खोके एकदम ओके, रस्त्यांवर दिसले तर ठोकेच ठोके, असा इशारा राऊत यांनी दिला. राज्यात अनेक योजना आहेत. मात्र सध्या एकाच योजनेची चर्चा सुरू आहे. पैशाने नाते विकत घेता येत नाही. ब्रिटीशांनी जे केले तेच भाजप सध्या करत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे राऊत म्हणाले.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान

परदेशी चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; बॉलीवूडला फटका बसणार