महाराष्ट्र

दिमाखात होणार 350 वा 'शिवराज्यभिषेक' सोहळा; प्रशासनाकडून जय्यत पुर्वतयारी

गडावर दहा हजार लिटर तर पायथ्याशी चाळीस हजार लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नवशक्ती Web Desk

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने प्रत्येक कार्यक्रमात सावधगिरी बाळगणे सुरु केले आहे. शिवजन्मोत्सव सोहळा जवळ आल्याने प्रशासनाने या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. या सोहळ्यादरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने याची पूर्ण तयारी केली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्यासह देशभरातून शिवप्रेमी मोठी गर्दी करतात. या सोहळ्यात शिवप्रेमींच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी रायगडावर प्रत्येक पाचशे मीटरवर वैद्यकीय मदत केंद्र उभारली जाणार आहेत. तसेच उपचारासाठी आयसीयू बेड्स आणि अॅम्ब्युलन्स देखील तयार ठेवण्यात येणार आहेत.

खारघर येथील घटना येथील घटनेनंतर महाराष्ट्र सरकार प्रत्येक कार्यक्रमात विशेष काळजी घेताना दिसत आहे. रायगडावरील कार्यक्रम देखील ऐन उन्हाळ्यात येत असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. या सोहळ्यादरम्यान शिवप्रेमींसाठी वैद्यकीय सुविधा थेट पायथ्यापासून ते वर गडापर्यंत देण्यात येणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच शिवपेमीसाठी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. रायगड चढणाऱ्या शिवप्रेमींसाठी तब्बल दीड लाख पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्सची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच गडावर दहा हजार लिटर तर पायथ्याशी चाळीस हजार लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाचे नियोजन

शिवराज्यभिषेक कार्यक्रमात आरोग्य विभागाकडून पुरेपूर नियोजन करण्यात येणार आहे. याअंर्गत रायगडावर २५ वैद्यकीय केंद्र उभारले जाणार असून त्यात जवळपास तीनशे अधिकारी/कर्मचारी, 2 आयसीयू बेड्स, 70 साधे बेड्स, 28 रुग्णवाहीका इत्यादी सेवा पुरवली जाणार आहे.

दळणवळणाची व्यवस्था

गडावर जाणाऱ्या शिवप्रेमीच्या दळणवळणाची देखील व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. पाचाड शिवसृष्टी परिसरात 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. तसेच गडाच्या पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. शिवप्रेंमीना गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग असणार आहेत. तर रोप-वे मार्ग निमंत्रकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाला पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त असणार आहे. रायगड परिसरात जवळपास 2 हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने असणार आहे. शिवप्रेमींसाठी गडाच्या पायथ्याशी 3 हजार वाहनांच्या पार्कींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहनतळ ते पाचाड नाक्यापर्यंत शिवप्रेमींची ने-आण करण्यासाठी महामंडळाच्या 150 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. हा प्रवास शिवप्रेमींना मोफत असणार आहे.

असा असेल कार्यक्रम

येत्या सहा जून रोजी शिवराज्यभिषेकाला 350 वर्ष पुर्ण होत असल्याने यंदाचा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडणार आहे. 1 जून रोजी रायगड परिसरात विविध सांकृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवार (2 जून) रोजी सकाळी 8:30 च्या सुमारास या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशाच्या प्रक्षेपणाने होणार आहे. मंगळवार (6 जून) रोजी देखील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पाचाडला 1 जून ते 6 जून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरुच असणार आहे.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?