संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

राज्यातील रेडी रेकनरच्या दरात वाढ

राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी ४.३९ टक्के वाढ राज्य सरकारने सोमवारी जाहीर केली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी ४.३९ टक्के वाढ राज्य सरकारने सोमवारी जाहीर केली आहे. तर मुंबईतील रेडी रेकनरच्या दरात ३.३९ टक्के वाढ केली. या वाढीव दरांमुळे घर खरेदी महाग होणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे हे नवीन दर उद्यापासून अंमलात येणार आहेत.

राज्यातील सर्व मनपा क्षेत्रात रेडी रेकनरच्या दरात सरासरी ५.९५ टक्के वाढ झाली. उल्हासनगरमध्ये ७.७२ टक्के, ठाणे व मीरा भाईंदरमध्ये ६.२६ टक्के तर नाशिकमध्ये ७.३२ टक्के दर असेल. तर नवी मुंबईत रेडी रेकनरच्या दरात ६.७५ टक्के वाढ झाली. सोलापुरात १०.१७ टक्के तर अमरावतीत ८.३ टक्के वाढ झाली. २०२२-२३ नंतर राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात वाढ केली आहे.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास