महाराष्ट्र

एसटी भाड्याने घेण्याच्या निविदा प्रक्रियेची चौकशी; १,७०० कोटींच्या नुकसानाबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसाठी बस भाड्याने घेण्याच्या निविदा प्रक्रियेच्या चौकशीचे आश्वासन दिले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसाठी बस भाड्याने घेण्याच्या निविदा प्रक्रियेच्या चौकशीचे आश्वासन दिले. या प्रक्रियेमुळे १,७०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

विधान परिषदेत फडणवीस म्हणाले की, या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांशी मिलीभगत करून महामंडळ स्तरावर कामाचे आदेश दिले गेले. या गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर एका महिन्याच्या आत कारवाई केली जाईल. फडणवीस काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत होते.

१,३१० बसेस घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे आदेश सरकार स्थापनेच्या प्रक्रियेदरम्यान (नोव्हेंबर २०२४ निवडणुकांनंतर) देण्यात आले. त्यावेळी संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात नव्हते आणि ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली होती, असे मुख्यमंत्ऱ्यांनी सांगितले.

यामुळे राज्याच्या तिजोरीला अंदाजे १,७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. हा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर निविदा प्रक्रिया थांबवण्यात आली आणि परिवहन विभागाच्या अतिरिक्त सचिवांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले, असेही फडणवीस म्हणाले.

परिवहन खात्याचा कारभार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे. शिवसेना हा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत सहभागी आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव