नाशिक टीसीएस प्रकरणात ‘इस्लाम पार्टी’ची एन्ट्री; न्यायालयात दिला वकील, संशयितांना पुरवली जात आहे कायदेशीर मदत  
महाराष्ट्र

नाशिक टीसीएस प्रकरणात ‘इस्लाम पार्टी’ची एन्ट्री; न्यायालयात दिला वकील, संशयितांना पुरवली जात आहे कायदेशीर मदत

नाशिक येथील बहुचर्चित ‘टीसीएस’ कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणाला आता एक नवे राजकीय वळण मिळाले आहे.

Swapnil S

नाशिक : येथील बहुचर्चित ‘टीसीएस’ कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणाला आता एक नवे राजकीय वळण मिळाले आहे. 'एमआयएम' पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी यापूर्वी आरोपींना आश्रय दिल्याचे उघड झाले असतानाच, आता मालेगावच्या 'इस्लाम पार्टी'ने या प्रकरणात एन्ट्री केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना आता इस्लाम पार्टीकडून कायदेशीर मदत पुरवली जात आहे. नाशिक न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख स्वतः न्यायालयात हजर होते.

इस्लाम पार्टीने या खटल्यासाठी स्वतंत्र वकील दिला असून, त्यांच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांनी न्यायालयात आरोपी दानिश शेख याची बाजू मांडली. ‘हे प्रकरण भविष्यात सर्वोच्च न्यायालयात जरी गेले, तरीही इस्लाम पार्टी ही कायदेशीर लढाई लढणार,’ अशी घोषणा माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

लढाई सुप्रीम कोर्टात गेली तरी लढू...

इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख म्हणाले की, ‘टीसीएस प्रकरण नाशिकमध्ये झाले, त्याला धार्मिक रूप देण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी सर्व काम करत होते, त्यांच्यात मैत्री होती. त्याला धार्मिक रूप दिले गेले. काही जातीयवादी लोकांनी हे काम केले. दानिश शेख याच्या घरचे आमच्याकडे आले, ते घाबरले होते. आम्ही वकील दिला, ते काम पाहत आहेत. माझ्या घराचे कागदपत्र व्यवस्थित आहे. धार्मिक रंग दिला जात असेल तर आम्ही राजकारणी मदत करत होतो. आम्ही पुढे देखील अशी लढाई लढू. ही लढाई नाशिक कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेली तरी आम्ही आणि इस्लाम पार्टी त्यासाठी उभे राहू’, असे त्यांनी म्हटले.

आरोपींच्या जामिनावर १९ जूनला सुनावणी

नाशिकमधील या कथित कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्यासह इतर दोन आरोपींच्या जामीन अर्जावर आता १९ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आज न्यायालयात आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेण्यात आली. कोर्ट आता १९ जून रोजी या जामीन अर्जावर निकाल देणार आहे. तत्पूर्वी, या सुनावणीसाठी याआधीही दोन वेळा तारीख देण्यात आली होती. या आगामी सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाची बाजूही ऐकून घेतली जाणार आहे.

दानिश शेखचा अर्ज फेटाळला

आरोपी दानिश शेखचे वकील फैज वसीफ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘निदा खान प्रकरणी आम्ही दानिश याच्या वतीने उपस्थित होतो. सरकारी वकील, फिर्यादी वकील आणि आम्ही संयुक्त युक्तिवाद केला. कोर्टात अनेक मुद्दे उपस्थित केले. दानिश याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात आली, त्यानंतर एमसीआर केला. दानिश याचा अर्ज पहिल्यांदाच केला आणि तो फेटाळण्यात आला आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट