Screengrab from X @airnews_mumbai
महाराष्ट्र

जालन्यात एसटी बस-टेम्पोचा भीषण अपघात; बसच्या वाहकासह सहा जण ठार, १७ जखमी

एसटी बस गेवराईहून जालन्याकडे निघाली होती. तर, मोसंबीने भरलेला टेम्पो अंबडच्या दिशेने येत होता.

Swapnil S

जालन्यात राज्य परीवहन मंडळाची एसटी बस आणि खासगी टेम्पोमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसच्या वाहकासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर १७ ते १८ जण जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वडीगोद्री जालना मार्गावरील शहापूरजवळ हा भीषण अपघात झाला. एसटी बस क्रमांक एम एच २० बी एल ३५७३ ही गेवराईहून जालन्याकडे निघाली होती. तर, मोसंबीने भरलेला टेम्पो अंबडच्या दिशेने येत होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी धाव घेतली आणि बसच्या खिडक्या तोडून अनेक जखमींना बाहेर काढले. अपघाताचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही, मात्र ओव्हरटेक करणाऱ्या टेम्पोने समोरून आलेल्या बसला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. तथापि, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. बसमध्ये एकूण २४ प्रवासी होते असे समजते. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना बाहेर काढले असून त्यांच्यावर अंबड आणि जालना येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

अपघातातील मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन