महाराष्ट्र

'पालखीशेजारी चप्पल घालून का आलात?', साधा प्रश्न विचारणाऱ्या पुजाऱ्याला बेदम मारहाण; जेजुरी गडावर संतापजनक प्रकार! VIDEO

जेजुरी गडावरील पालखी परिसरात चप्पल घालून आलेल्या काही जणांना हटकणाऱ्या पुजाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Mayuri Gawade

जेजुरी गडावरील पवित्र पालखी परिसरात चप्पल घालून आलेल्या काही जणांना हटकणाऱ्या पुजाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून जेजुरी गड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी गडावर नेहमीप्रमाणे भाविकांची गर्दी होती. यावेळी पालखी परिसरात काही व्यक्ती चप्पल घालून फिरत असल्याचे एका पुजाऱ्याच्या निदर्शनास आले. मंदिरातील परंपरा आणि धार्मिक नियमांनुसार पालखी परिसरात पादत्राणे घालण्यास मनाई असल्याने त्यांनी संबंधितांना चप्पल काढण्यास सांगितले.

मात्र, या सूचनेवरून वाद निर्माण झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींनी पुजाऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि ४ ते ५ जणांच्या गटाने पुजाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.

भाविकांमध्ये संताप

मंदिर परिसरातच झालेल्या या घटनेमुळे उपस्थित भाविकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक स्थळांच्या नियमांचे पालन करण्यास सांगणाऱ्या पुजाऱ्यावरच हल्ला झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुजाऱ्यावर उपचार सुरू

मारहाणीत जखमी झालेल्या पुजाऱ्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून या प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार