एक्स @cbawankule
महाराष्ट्र

भाजपच्या यशाची बावनकुळे यांच्या पाठीवर थाप; नड्डा यांच्या हस्ते बावनकुळे यांचा सत्कार

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र महायुतीत मोठा भाऊ भाजप ठरला असून भाजपला १३२ जागांवर विजय मिळाला.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र महायुतीत मोठा भाऊ भाजप ठरला असून भाजपला १३२ जागांवर विजय मिळाला. भाजपच्या या यशाबद्दल भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाच्या केंद्रीय कार्यशाळेला नवी दिल्ली येथे केंद्रीय कार्यालयात सुरूवात झाली. त्यावेळी नड्डा यांनी बावनकुळे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

सर्व राज्यांच्या प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटन मंत्री व प्रमुख पदाधिकारी व केंद्रीय पदाधिकारी यांच्यावतीने अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत असल्याचे शब्द राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी उच्चारले.

हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा तर आहेच आहे, पण पार्टीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा, पार्टी नेतृत्वाने दिलेल्या दायित्वाची पूर्णतः करणारा तसेच फलश्रुती असलेला आहे, अशी भावना व्यक्त करत आजचा सत्काराचा क्षण मी माझ्या मनात जपून ठेवत आहे. हा सन्मान मी माझ्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो, अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाची माहिती देवून नियोजनाची मांडणी केली.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत