महाराष्ट्र

कर्जतच्या मातीचे इस्रायलच्या राजदूतांकडून कौतुक

Swapnil S

कर्जत : कृषी क्षेत्रात प्रगत देश म्हणून इस्रायल जगाच्या नकाशावर अधोरेखित आहे. अशात इस्रायलचे भारतातील वाणिज्य राजदूत कॉब्बी शोशानी यांनी नुकतीच कर्जत तालुक्यातील सगुणा बाग येथे भेट दिली. तर या भेटीवेळी त्यांनी येथील एसआररटी लागवड पद्धत जाणून घेतानाच येथील मातीला विशिष्ट सुगंध असल्याचे म्हणत मातीचे दिलखुलासपणे कौतुक केले.

नेरळ येथील सगुणा बाग हे केवळ कृषी पर्यटन केंद्र नाही तर शेतकऱ्यांसाठी कायम विद्यापीठ राहिले आहे. शेतकऱ्यांसाठी नवेनवे प्रयोग सगुणा बागचे निर्माते कृषिभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी केले आहेत. त्यामुळे जगभरातून या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी शास्त्रज्ञ येत असतात. सन २०११ रोजी संशोधन केलेल्या एसआरटी म्हणजेच सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कष्ट व खर्च कमी करून उत्पादनात कमालीची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी व आत्मविश्वास होऊ लागले आहेत. तर हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्मसात करून महाराष्ट्रभर या पद्धतीने शेती केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर दिनांक इस्रायलचे वाणिज्य राजदूत कॉब्बी शोशानी यांनी सगुणा आपल्या सहकाऱ्यांसह अचानक सगुणा बाग येथे भेट दिली. यावेळी वाहनातून उतरल्या उतरल्या त्यांनी येथील माती हातात घेऊन या मातीला असीम सुगंध येत असल्याचे सांगितले. तर यासह त्यांनी सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान याठिकाणी कसे काम करते याची माहिती खुद्द शेतात उतरून भडसावळे यांच्याकडून करून घेतली.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

गरमीच्या दिवसांत दररोज लस्सी पिण्याचे फायदे