महाराष्ट्र

केसीआर आपल्या ताफ्यासह सोलापूरकडे रवाना ; विठ्ठल-रुक्मिणी तसंच तुळजा भवानीचे घेणार दर्शन

केसीआर हे पंढरपूर येथे दर्शनाला येत असताना हिंदूराष्ट्र सेनेची मोठी मागणी

नवशक्ती Web Desk

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातून आपल्या 'भारत राष्ट्र समिती' (बीआरएस) या पक्षाच्या विस्ताराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील मोठा उत्सव असलेल्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे पांडूरंगाचं दर्शन घ्यालाय निघाले आहेत. केसीआर हे हैदराबाद येथून सोलपूरकडे आपल्या पक्षाचे आमदार-खासदार व प्रमुख नेत्यांसह जवळपास ६०० गाड्यांचा ताफा घेवून निघाले आहेत.

केसीआर हे पंढरपूर येथे दर्शनाला येत असताना हिंदूराष्ट्र सेनेने मोठी मागणी केली आहे. केसीआर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी हिंदूराष्ट्र सेनेच्या सोलापूर शाखेने केली आहे. चंद्रशेखर राव यांच्या मुक्कामासाठी सोलापूरात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये २२५ खोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या स्वागतासाठी शहरात तेलुगू भाषिकांचा प्रभाव असलेल्या भागात बीआरएस पक्षाचे ध्वज उभारण्यात आले आहेत.

आज रात्री केसीआर यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळाचा सोलापूर येथे मुक्काम असणार आहे. तसंच उद्या ते आपल्या मंत्रिमंडळ आणि आमदार-खासदारांसह पंढरपूर रवाना होणार आहेत. पांडूरंगाचं दर्शन घेतल्यानंतर तुळजापूर येथे तुळजा भवानी मंदिरात देखील केसीआर हे आपल्या ताफ्यासह दर्शन घेणार आहेत. त्यापूर्वी भगरीथ भालके यांच्या गावात सरकोली येथे केसीआर शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भालके हे त्यांच्या सहकाऱ्यांसह बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

केसीआर यांचा पंढरपूर आणि तुळजापूर दौरा हा चर्चेचा विषय ठरत आहे. केसीआर यांनी 'अबकी बार, किसान सरकार' अशी घोषणा देत महाराष्ट्र पक्षविस्तार करायला सुरुवात केली आहे. त्यांनी नांदेड आणि हिंगोली येथून महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विस्तार करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर त्यांनी व्हाया छत्रपती संभाजीनगर मार्गे नागपूरवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील अनेक माजी आमदार तसंच कार्यकर्ते बीआरएसमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएसकडून मुख्यमंत्री पदाची जाहीर ऑफर देण्यात आली होती.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत