किल्ले राजकोट येथे ‘लेझर अँड साऊंड शो’; आमदार प्रमोद जठार यांची माहिती (Photo-X/PTI)
महाराष्ट्र

किल्ले राजकोट येथे ‘लेझर अँड साऊंड शो’; आमदार प्रमोद जठार यांची माहिती

मालवण शहरातील ऐतिहासिक किल्ले राजकोट परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या ठिकाणी आता लेझर लाइट अँड साऊंड शो ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Swapnil S

मालवण : शहरातील ऐतिहासिक किल्ले राजकोट परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या ठिकाणी आता लेझर लाइट अँड साऊंड शो ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मालवणच्या खोल समुद्रात गेली साडेतीनशे वर्ष भक्कमपणे उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला आणि छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती साऱ्या जगाला व्हावी या प्रमुख उद्देशाने ही व्यवस्था करण्यात येणार आहे.

भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी नुकतीच राजकोट येथे भेट दिल्यानंतर ही घोषणा केली. आपल्या आमदारकीचा पहिला एक कोटी रुपयांचा निधी या कामासाठी छत्रपतींच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजपाचे स्वीकृत सदस्य रविकिरण तोरसकर यांनी राजकोट येथे शिवस्मारकाच्या ठिकाणी 'लेझर लाइट व साऊंड शो' ची व्यवस्था करावी अशी संकल्पना मांडली त्याला प्रतिसाद देत जठार यांनी वरील घोषणा केली.

या व्यवस्थेमुळे किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले राजकोट येथील शिवस्मारकाला भेट देणाऱ्या लोकांना या ‘शो’द्वारे ऐतिहासिक माहिती देता येईल. शिवाय पर्यटकांच्या संख्येतही वाढ होण्यास त्यामुळे मदत होईल, असेही जठार यांनी स्पष्ट केले.

रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत पर्यटनाची एक साखळी निर्माण करण्यासाठी आम्ही आता कामाला लागलो आहोत. संगमेश्वर कसब्यामध्ये छत्रपती 'संभाजी महाराजांचे त्यागाचे सर्वोच्च प्रतिक' या स्मारकाच्या उभारणीस सुरुवात झालेली आहे. तर राजापूरला ब्रिटिशांची जी वखार आणि जो किल्ला आहे त्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या ठिकाणी 'आरमाराचे संग्रहालय' व हेलियम वायूचा जो शोध लावला त्याची माहिती देणारे संग्रहालय करण्यात येणार आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये