कोल्हापूरमध्ये वाहतुकीत बदल; काही ठिकाणी 'नो पार्किंग'; 'सम-विषम' पार्किंग नियम लागू | प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये वाहतुकीत बदल; काही ठिकाणी 'नो पार्किंग'; 'सम-विषम' पार्किंग नियम लागू

शहरातील वाढत्या वाहनगर्दी आणि वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर वाहतूक शाखेने महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. सीपीआर चौक ते जैन बोर्डिंग हा मार्ग 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Swapnil S

कोल्हापूर : शहरातील वाढत्या वाहनगर्दी आणि वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर वाहतूक शाखेने महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. सीपीआर चौक ते जैन बोर्डिंग हा मार्ग 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला असून, महावीर कॉलेज परिसरात 'सम-विषम' पद्धतीचा पार्किंग नियम लागू करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज सुरू झाल्यानंतर या मार्गावर वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक शाखेकडून सर्वेक्षण करण्यात आले. रस्ता अरुंद असल्याने आणि दोन्ही बाजूंनी वाहन पार्किंग केल्यामुळे वारंवार कोंडी निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने तातडीने हे नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला.

वाहतूक शाखेने नव्या नियमानुसार आवश्यक सूचना फलक लावण्यासही सुरुवात केली असून, अपवादात्मक परिस्थिती वगळता नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील नागरिक, वकील आणि वाहनचालकांनी नवीन वाहतूक नियोजनास सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. थोडीशी शिस्त पाळली, तर वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
नंदकुमार मोरे, निरीक्षक वाहतूक पोलीस

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला; १२२ जागांसाठी उद्या मतदान

निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात! जमीन घोटाळ्यावरून अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर; सत्य लवकरच बाहेर येईल!

शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग; डांबर काढणी पूर्ण; पर्यायी मार्गाची दुरुस्तीही युद्धपातळीवर

आता ‘भुयारी रोड नेटवर्क’; सुमारे ७० किलोमीटर लांबीचा भूमिगत कॉरिडॉर; DPR बनविण्याची प्रक्रिया सुरू

Thane : भटक्या कुत्र्यांची दहशत; उपचारापेक्षा वेदना भयंकर