मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १७ ऑगस्ट रोजी शुभारंभ  
महाराष्ट्र

‘लाडक्या बहिणी’च्या खात्यात तिसऱ्या दिवशीही पैसे; १६ लाख महिलांना रक्कम मिळाली; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात शुक्रवारी दिवसभरात १६ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात शुक्रवारी दिवसभरात १६ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होतील, असे जाहीर करण्यात आले होते. १४ ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असून शनिवारी ४८ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

एक कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा

महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली. याबाबत महिलांची फसवणूक होईल, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. महायुतीने १७ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, असे जाहीर केले. पात्र महिलांच्या बँक खात्यात १४ ऑगस्टपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत एक कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे महिला व बाल कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी