मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 
महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेत नवीन नोंदणी रखडली

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण योजना’ महायुती सरकारने आणली. या योजनेला राज्यातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Swapnil S

प्राजक्ता पोळ/मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण योजना’ महायुती सरकारने आणली. या योजनेला राज्यातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार निवडून आले. आता ‘लाडक्या बहिणीं’च्या पात्रता तपासणीला प्रारंभ झाला आहे. तर या योजनेतील लाडक्या बहिणींच्या नव्या नोंदणीला चाप लावल्याचे दिसत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेंतर्गत इच्छुक महिलांसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर होती. त्यानंतर सहा महिने उलटून गेले असले तरी सरकारने अद्याप नवीन अर्जदारांसाठी नोंदणी पुन्हा सुरू केलेली नाही. त्याऐवजी सरकारचा भर सध्या लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांच्या छाननीवर आहे. सध्या हजारो महिला या योजनेपासून वंचित आहेत. अलीकडेच २१ वर्षे पूर्ण झालेल्या आणि आता पात्र ठरणाऱ्या महिलांचा तसेच तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे अर्ज पूर्वी नाकारण्यात आले होते, अशा महिलांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळ निर्णय घेतल्यानंतरच नोंदणी पुन्हा सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. सरकारने तिजोरीवर वाढत्या आर्थिक ताणामुळे लाभार्थ्यांची छाननी सुरू केली. परिणामी, जवळपास १३ लाख महिलांना योजनेतून वगळले. गेल्या मार्च महिन्यात २.४७ कोटी महिलांच्या खात्यांत निधी जमा करण्यात आला.

उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी