लासलगाव : हिंदू-मुस्लिमांनी केले सार्वजनिक लक्ष्मीपूजन; १६ वर्षांची परंपरा कायम 
महाराष्ट्र

लासलगाव : हिंदू-मुस्लिमांनी केले सार्वजनिक लक्ष्मीपूजन; १६ वर्षांची परंपरा कायम

येवला तालुक्यातील विखरणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या १६ वर्षापासून हिंदू-मुस्लिम बांधवांसह एकत्र सुरु असलेली सार्वजनिक लक्ष्मीपूजनाची परंपरा यंदा ग्रामपंचायतचा कारभार शासन नियुक्त प्रशासकाकडे असतानाही उत्साहात कायम ठेवली.

Swapnil S

लासलगाव : येवला तालुक्यातील विखरणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या १६ वर्षापासून हिंदू-मुस्लिम बांधवांसह एकत्र सुरु असलेली सार्वजनिक लक्ष्मीपूजनाची परंपरा यंदा ग्रामपंचायतचा कारभार शासन नियुक्त प्रशासकाकडे असतानाही उत्साहात कायम ठेवली.

येवला पंचायत समितीचे माजी गटनेते मोहन शेलार यांच्या संकल्पनेतून २०१० मध्ये या परंपरेचा प्रारंभ झाला. तो आजही सुरू आहे. ग्रामपंचायत ही केवळ सरपंच, उपसरपंच अथवा सदस्यांची नसून संपूर्ण गावाची आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी या उद्देशाने सार्वजनिक लक्ष्मी पूजन सुरू करण्यात आले. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ एकत्र येतात ग्रामपंचायतचे चेकबुक, घरपट्टी व पाणीपट्टी पावती पुस्तकाचे विधिवत पूजन केले जाते.

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला फुल बाजारात झेंडूच्या फुलाला मोठी मागणी होती. ठाणे मुंबईसह परराज्यातील व्यापाऱ्यांनी नाशिकच्या बाजारात हजेरी लावत फुलांची रात्री उशिरा पर्यंत खरेदी केली होती. फुलांच्या प्रतवारीनुसार १०० ते १५० तर चांगल्या प्रतीच्या फुलांना १५०ते २५० रुपये प्रति क्रेट्स दर मिळाला.

झेंडूचे दर कोसळले; शेतकऱ्यांना फटका

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी झेंडू फुलाचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी फुले विक्री न करता परतीच्या मार्गावर रस्त्यांत फुले फेकून दिली.

धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत मुंबईत पहिला गुन्हा दाखल; लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीचा आरोप

Mumbai : कन्व्हेयन्स डीड करून देण्याचे बिल्डरला आदेश; कांदिवलीच्या गृहनिर्माण संस्थेला न्यायालयाचा दिलासा

'विहार' खोदणार दुसरा बोगना; 'तुळशी' द्वारे २७० मीटर खोदकाम पूर्ण, दुहेरी बोगद्याच्या खोदकामाला वेग, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता

'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार

मणिपूरमध्ये ३० एप्रिलपर्यंत जनगणना स्थगित; उच्च न्यायालयाचे निर्देश